डॉक्टर सहकुटुंब कराडला नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून चोरट्यांचा डल्ला

Sangli News : मांगले (ता. शिराळा, जि. सांगली) येथील डॉ. बी. एन. पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम दवाखान्याच्या दरवाजाच्या कुलपाची कडी उचकटून अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील लॉकरमधील २९ तोळे सोने, १०० ग्रॅम चांदी व रोख ५० हजाराची रोकड अशी एकूण १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना आज दुपारी उघडकीस आली.

गावाच्या पूर्वेला इनाम पाणंद रस्त्यावर डॉ. पाटील यांचा गंधा नर्सिंग होम हा दवाखाना आहे. डॉ. पाटील शनिवारी कुटुंबासह कराडला नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेवून डल्ला मारला. आज सकाळी शेजारच्या नागरिकांनी दूरध्वनी वरून दवाखान्याचा दरवाजा उघडा असल्याचे डॉ. पाटील यांना सांगितले. 

चोरट्यांनी दवाखान्याचे कुलूप उचकटून डॉक्टर रहात असलेल्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील तिजोरीशेजारी असलेल्या टेबलमधील लॉकरच्या चाव्या घेवून दागिने व रोख रक्कम लंपास केली. यावेळी चोरट्यांनी तिजोरीतील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त विस्कटून टाकले. चोरी करून चोरटे पसार झाले. मात्र शनिवार ते मंगळवार दरम्यान नेमकी कोणत्या दिवशी चोरी झाली आहे हे समजू शकलेले नाही.

घटनास्थळी श्वानपथक दाखल

डॉ. पाटील आज दुपारी निरोप समजल्यानंतर आले. त्यावेळी दवाखान्याच्या दरवाजाचे कुलूप उचकटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिराळा पोलिसांना कळविले. त्यानंतर शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सांगलीहून श्वान पथक आणण्यात आले. मात्र श्वानाने वारणानगर रोडवर दोनशे मीटरपर्यंत माग दाखवला व त्याच परिसरात घुटमळले.

रात्री उशीरा डॉ. बी. एन. पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नसला तरी चोरट्यांना डॉक्टर परगावी गेल्याचे माहिती असल्यामुळे पाळत ठेवून चोरी केली असावी अशी चर्चा आहे. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील अधिक तपास करीत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613