शिवसेनाप्रमुखांचे विचार हाच आमचा श्वास; साताऱ्यात पदाधिकाऱ्यांचा निर्धार
Satara News : एकजूट, निष्ठा व हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हाच आमचा श्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेना पुन्हा एकदा भगवा झंझावात निर्माण करेल असा विश्वास सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
गोडोली (सातारा) येथे सौभाग्य मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना उपसचिव प्रवीण महाले, उपनेत्या छायाताई शिंदे, सातारा लोकसभा संपर्कप्रमुख उदय दळवी, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे व हर्षद कदम यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
अधिक ताकदीने मैदानात उतरणार
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाची दिशा, जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर भविष्यातील आंदोलनाची रणनीती, तसेच सर्वसामान्य जनतेच्या न्याय-हक्कासाठी शिवसेना कशी अधिक ताकदीने मैदानात उतरणार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, दत्ता नलावडे, महिला आघाडीच्या विजयश्री साखरे, संगिता राऊत, अमृता पाटील, संगिता जाधव, बेबीताई गोळे, ज्योती मोहिते, शिवआरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक निमिष शहा, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराव जगताप, संतोष चव्हाण, महेश शिंदे, हैबतबापू नलवडे, नितीन गोळे, रमेश बोराटे, सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत, शशिकांत हापसे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व सर्व सेलचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या