अरे बापरे... सातारा जिल्हा ४ हजारच्या उंबरठ्यावर | 31.07.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |

गजानन चेणगे
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले असून गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १६३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३८२४ पर्यंत गेली आहे. हा आकडा पाहता पाहता चार हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 
सातारा, कराड शहर आणि परिसराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. जावली तालुक्यातील दुदुस्करवाडीत १७, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडीत ११, आगाशिवनगर येथे ७, कोयना वसाहत येथे ८ रूग्ण बाधित निघाल्याने तेथील लोकांची झोप उडाली आहे. आजअखेर जिल्ह्यातील १९८२ जण कोरोनामुक्त झाले असून प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या १७१२ इतकी आहे.
नवीन वाढलेल्या बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील २५ वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील २५ वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील २८ वर्षीय पुरुष, नेरळे येथील ३५ वर्षीय महिला, वाई तालुक्यातील बोरगाव येथील १७ वर्षीय युवक, पसरणी येथील ४८ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, यशवंतनगर येथील २८ वर्षीय महिला, बोपेगाव येथील १८ वर्षीय युवती, परखंदी येथील ७३ वर्षीय पुरुष, वाई येथील ५५ वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील ३३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठ येथील ६५, ३७, ३८ वर्षीय महिला व २०, ४२ वर्षीय पुरुष, १४, १७ वर्षीय बालक, कराड येथील २८ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील ३७ वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील २५ वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील ३८ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ६० वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील १६ वर्षीय युवती, ४६, ३५ वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील २०, ५०, ३७, ३७ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष,१८,१२ वर्षीय युवक व १५ वर्षीय युवती, आगाशिवनगर येथील ३६, ४०, ६५ वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरुष व १३ वर्षीय बालक, १९ वर्षीय तरुण, १७ वर्षीय युवती, गजानन हौसिंग सोसायटी येथील ७८ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील शामगाव येथील ७६, ४४ वर्षीय महिला १३ वर्षीय मुलगी, कालवडे येथील १४, १२, १३ वर्षीय युवक, ४५ वर्षीय पुरुष, घराळवाडी येथील ५९ वर्षीय पुरुष, वडगांव येथील ६३ वर्षीय पुरुष ६०, ३४ वर्षीय महिला, ७, ९ वर्षीय बालिका, शिवडे येथील २५, ६३ वर्षीय पुरुष, उंब्रज येथील ६५, ५८ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ३८ वर्षीय महिला, रेठरे बु. येथील ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील ८९ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील २६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, विंग येथील ४५ वर्षीय पुरुष व ७४ वर्षीय महिला, खंडाळा येथील ३०, ३३ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला, पाडेगांव येथील २० वर्षीय पुरुष, राजेवाडी येथील ७५ वर्षीय महिला, मंडई कॉलनी (शिरवळ) येथील १९ वर्षीय महिला, मोर्वे येथील ६७ वर्षीय पुरुष, सातारा शहरातील भवानी पेठ येथील २८,२१ वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील ३, १२ वर्षीय बालक, २३, ३८ वर्षीय महिला व ४४ वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील ६२ वर्षीय पुरुष, सदर बझार येथील २३ वर्षीय महिला तसेच नागठाणे येथील ५७ वर्षीय पुरुष, अतीत येथील ४९ वर्षीय पुरुष, गोडोली येथील ३९ वर्षीय महिला, शिवथर येथील ६१ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ६३ वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी येथील ३३, ३५ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला, शिंगणापूर येथील ६९ वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील ३६ वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील ३६ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला, वाघोली येथील ३५ वर्षीय महिला व ५५, ६०, ७४ वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ५० वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला, रहिमतपूर येथील २४ वर्षीय पुरुष, कुमठे येथील ७० वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील खटाव येथील ७२ वर्षीय पुरुष, वडूज येथील ४२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, मायणी येथील ३९,३१ वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील जिंती नाका येथील १८ वर्षीय युवक, ३३, ७४ वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील ४५, २०, ३९ वर्षीय पुरुष, १७, १४, १३ वर्षीय युवती व ३५ वर्षीय महिला व ४ वर्षाची बालिका, रविवार पेठ येथील २७ वर्षीय महिला, सासवड येथील ७०, ६४ वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील ३८ वर्षीय पुरुष, उपळे येथील ५३ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील ११, ९, ७ वर्षीय बालिका ७०, २३ वर्षीय महिला, ५८, २३, ३८, ५१, ६०, ५५ वर्षीय पुरुष, गोडवली येथील ३१ वर्षीय महिला, मल्होत्रा भवन, भोसे खिंड येथील ३० वर्षीय महिला व १० वर्षीय बालीका, पाचगणी येथील २४ वर्षीय पुरुष व २२, ४८ वर्षीय महिला, जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी ५५, ६०, २५, ३१, ४५, ६० वर्षीय महिला, ७५, ४०, ३५, ३०, २९, ५३, ५७, ९१ वर्षीय पुरुष व १०, ८ वर्षाचा बालक व ६ वर्षाची बालिका, सायगाव येथील ५४ वर्षीय पुरुष यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

सातारा जिल्ह्यात आजअखेर... 
घेतलेले एकूण नमुने : २७,८७०
एकूण बाधित : ३,८२४
घरी सोडण्यात आलेले : १,९८२
मृत्यू : १३०
उपचारार्थ रुग्ण : १,७१२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या