राखी वेळेत पोहोचणार; सातारा पोस्टल विभागाचे विशेष नियोजन | 31.07.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |

सातारा : रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा उत्सव असून त्यात भावनिक आसत्की आहे. त्यामुळे सातारा विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राखी टपालाची प्राधान्यक्रमांकानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली राखी मेल बॉक्समध्ये पोस्ट करावी, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचा उपयोग करता येईल व जलद गतीने पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करता येईल. ज्यांना राखी पाठवायची आहे, त्यांचा योग्य पिन कोड नंबर लिहिण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे आपली राखी त्वरित वितरित होण्यास मदत होईल. राखीचा सण येत्या ३ ऑगस्ट रोजी असून त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सातारा पोस्टल विभागाने रविवारी (दि. २ रोजी) सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे, असे सातारा डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या