सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री आणखी १६८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४ हजार २५१ वर गेली आहे. त्याचबरोबर खटाव व वाई तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे दोघांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा १३८ पर्यंत पोहोचला आहे.
जिल्ह्यात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील कराड, टेंभू, जावलीतील दुदुस्करवाडी, मायणी, शेंदुरजणे, पिंपोडे बुद्रुक, पाचगणी या ठिकाणी कोरोनाचे थैमान सुरू असल्याने लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे खटाव येथील ७२ वर्षीय पुरुष व कवठे (ता. वाई) येथील ७० वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
सातारा जिल्हा अपडेट्स
घेतलेले एवूâण नमुने : २९,०४२
एवूâण बाधित : ४,२५१
डिस्चार्ज दिलेले : २,०८४
मृत्यू : १३८
उपचारार्थ रुग्ण : २०२९

0 टिप्पण्या