सातारा जिल्ह्यात आणखी १४१ पॉझिटिव्ह, तर ९० जणांना डिस्चार्ज | 03.08.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |

सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजार ४१३ पर्यंत गेला आहे. त्याचवेळी आज दिवसभरात तब्बल ९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वाढलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील शाहूपुरी (१४ रूग्ण), सोनापूर (३७), खंडाळा तालुक्यातील विंग (८), कोरेगाव (३१), फलटण (७) या ठिकाणी कोरोनाचे जास्त रूग्ण निघाले आहेत. आजच्या एवूâण बाधितांमध्ये अँटिजन चाचणी अहवालात ४४ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 
डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये खंडाळा तालुक्यातील रामबाग सिटी, शिरवळ येथील ३७ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय बालक, तळेकर वस्ती येथील ११ महिन्याची बालिका, सांगवी येथील १९ वर्षीय तरुणी, नायगाव येथील ७ वर्षीय बालक, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील ३४ वर्षीय पुरुष, स्टार सिटी, शिरवळ येथील ३८ वर्षीय महिला, विंग येथील ४४, ५२, २३ वर्षीय पुरुष, जवळे येथील ३४ वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील शामगाव येथील ३३, ४२, ६० वर्षीय महिला, २१, ३८ वर्षीय पुरुष वर्षीय, ५ वर्षीय बालिका, शेणोली येथील ७५ वर्षीय पुरुष, किवळ येथील ६५ वर्षीय पुरुष, ३२, ५५, ३४, वर्षीय महिला, १३ वर्षीय बालिका, १० वर्षीय बालक, कालगाव येथील २८, ६५, २८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, येवती येथील २४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ४२ वर्षीय पुरुष, म्हासोली येथील ३० वर्षीय पुरुष, सैदापूर येथील २५, ६२ वर्षीय पुरुष, ४७, ५६, २८ वर्षीय महिला व ८ वर्षीय बालिका, श्रध्दा क्लिनिक येथील ३८ वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरुष, कसनी येथील ३८ वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील २७ वर्षीय महिला, कालवडे येथील ६५ वर्षीय महिला, ६ वर्षीय बालक, शुक्रवार पेठ येथील ३८ वर्षीय पुरुष ६, ३४ वर्षीय महिला, १२ वर्षीय बालक, सातारा तालुक्यातील सातारा येथील यशवंत हॉस्पिटल येथील ३४ वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील २६, ५३ वर्षीय महिला, ९ वर्षीय बालक ५, ५ वर्षीय बालिका, ३० वर्षीय पुरुष, माची पेठ येथील ३० वर्षीय पुरुष, अमर लक्ष्मी (देगांव रोड) येथील ३८, ४५ वर्षीय महिला, १२ वर्षीय बालक, १४ वर्षीय बालिका ५२, २२ वर्षीय पुरुष, कण्हेर येथील ४५ वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील वडुज येथील ६६ वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील मलठण येथील २२, २६, ६० वर्षीय महिला, ३७, ४० वर्षीय पुरुष, ३ वर्षीय बालिका, रिंग रोड येथील ८७, ५० वर्षीय पुरुष, ७७, ४५, ३८ वर्षीय महिला, १६, १० वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील ६२, ३८ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, १० वर्षीय बालक, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ३८, ५९, ३५ वर्षीय महिला, १५, १४, १२, ६ वर्षीय बालिका, १४ वर्षीय बालक, ३४, ४२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
५६१ जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २३, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ८५, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील २९, वाई येथील ४४, खंडाळा येथील ८६, पानमळेवाडी २७, मायणी २७, महाबळेश्वर ९, पाटण ५५, दहिवडी २७, खावली ३८ व कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील १११ अशा एवूâण ५६१ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.  

सातारा जिल्हा अपडेट 

घेतलेले एवूâण नमुने : २९,९३०
एवूâण बाधित : ४,४१३
घरी सोडण्यात आलेले : २,२१८
मृत्यू : १३९
उपचारार्थ रुग्ण : २,०५६

पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या