सातारा, कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये आज दमदार पाऊस झाला. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून रस्त्यावरील वर्दळ रोडावल्याचे पहायला मिळाले. वाई, खंडाळा, कोरेगाव तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण असून दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. दुष्काळी माण, फलटण, खटाव तालुका मात्र अद्याप तहाणलेलाच आहे. ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे, तेथील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे भात लागणीच्या कामाला वेग येणार आहे.
जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३०८.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात व कंसात आजअखेर झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा ९.३६ (३५४.४३), जावली ३३.१० (६४६.३३), पाटण ४५.७३ (५९७.७३), कराड १६.१५ (२९७.१५), कोरेगाव ५.८९ (२६०.६१), खटाव १.९३ (२५५.०६), माण ०.२९ (२४५.७१), फलटण ० (२४२.४०), खंडाळा ११.६५ (२२७.४०), वाई २३.२९ (३६६.२४), महाबळेश्वर १६१.०८ (२२०६.३६).

0 टिप्पण्या