जिल्ह्यात माण, फलटण तालुके वगळता सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. तथापि, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातही महाबळेश्वर, पाटण तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मागील तीन दिवसात प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे १५३, नवजा येथे १०६ व महाबळेश्वर येथे १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून उपयुक्त पाणीसाठा ६३.९९ टीएमसी इतका झाला आहे.
जिल्ह्यात चोवीस तासात व वंâसात आजअखेर झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा १९.५८ (४६१.२९), जावली ३०.७३ (८२६.५८), पाटण ३८.८२ (७८१.१८), कराड १३.८५ (३७३.९२), कोरेगाव ५ (३२३.७२), खटाव ३.३८ (२८५.४२), माण ०.०० (२६४.१४), फलटण ०.०० (२५७.४०), खंडाळा २.७० (२८९.९०), वाई ९.३० (४५७.९७), महाबळेश्वर १४४.२८ (२८५८.३८). जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व वंâसात टक्केवारी अशी : धोम ६.४७ (५५.३८), धोम - बलकवडी ३.०३ (७६.६४), कण्हेर ६.१२ (६३.८३), उरमोडी ७.४१ (७६.८१), तारळी ३.५२ (६०.२९), निरा -देवघर ५.०१ (४२.७२), भाटघर १३.०७ (५५.६०), वीर ६.१२ (६५.०८).

0 टिप्पण्या