जिल्ह्यातील मलकापूर, ओंड, चोरे, अंगापूर वंदन, क्षेत्र माहुली, पाटण, कुमठे आदी गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्ण निष्पन्न झाले असून गावकNयांची झोप उडाली आहे. सातारा तसेच कोल्हापूर जिल्ह्यात हाताबाहेर चाललेल्या या परिस्थितीमुळेच दस्तुरखुद्द खासदार शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले आहे. आजच त्यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक घेण्यात आली आणि कोरोनाला आवर घालण्यासाठी डिझास्टर प्लॅन करण्यात आला आहे.
दरम्यान, सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सुरुर (ता. वाई) येथील ७५ वर्षीय महिला, पाटण येथील ५५ वर्षीय पुरुष व विकासनगर (सातारा) येथील ६१ वर्षीय पुरुष या ३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १७४ वर गेली आहे.
सातारा जिल्हा अपडेट
घेतलेले एकूण नमुने : ३२,१२७
एकूण बाधित : ५,६३९
घरी सोडण्यात आलेले : २,६१५
मृत्यू : १७४
उपचारार्थ रुग्ण : २,८५०

0 टिप्पण्या