सातारा सिव्हिलला प्रदीप व्यास यांची सरप्राईज व्हिजिट | 10.08.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |


सातारा : कोरोनासारख्या महामारीच्या काळात सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्या. त्यामुळे सातारा सिव्हिल चर्चेत राहिले. या कालावधीतच सिव्हिलमधील टॉयलेटमध्ये अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी रविवारी सायंकाळी सिव्हिलची पाहणी करत प्रशासनाची झाडाझडती घेतली.

गेल्या काही दिवसात सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार अनेक विविध घटनांमुळे चव्हाट्यावर आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांच्या मनमानी कारभाराचा फटका आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्यांना बसला आहे. यातच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्री जातीचे अर्भक ड्रेनेजमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. याची गंभीर दखल खासदार शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतली आणि सिव्हिलच्या कारभारावर ताशेरे ओढत डॉ. गडीकर यांची उचलबांगडी केली. 

या पाश्र्वभूमिवर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी सायंकाळी सिव्हिलची पाहणी केली. परिसराची पाहणी करत त्यांनी कारभार सुधारण्याच्या सूचना केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या