साताNयात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅब उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर सोमवारी कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन झाले. कालच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराडमध्ये आजपासून लॅब कार्यान्वित होईल असे सांगितले होते. या लॅबममधून रोज ३८० जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल २४ तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या