शिवथर येथे फिर्यादी गणेश मच्छिंद्रनाथ साबळे व त्याचे भाऊ अजित प्रताप कदम हे घराच्या दारात बसले होते. यावेळी शाशिकांत उर्पâ गोट्या भंडलकर, रामभाऊ यांचा मुलगा (नाव माहीत नाही), राहुल मच्छिंद्र बोडरे, बाळू बोडरे, अमर बाळू खोमणे यांनी फिर्यादीच्या चुलत्यास वस्तीतून हाकलून दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मारहाण केली. शशिकांत भंडलकर याने गणेश साबळे याच्या डोक्यात दगड मारला. गणेश साबळे यांनी तो दगड चुकवल्याने अजित कदम यांच्या गुडघ्याला लागून ते जखमी झाले. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार कदम तपास करत आहेत.
शशिकांत तानाजी भंडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मस्करी केल्याच्या समजातून अजित प्रताप कदम, अनिल गणेश साबळे, राजेंद्र प्रताप कदम, मोहन रामचंद्र साबळे, विजय प्रताप कदम, तन्मय राजेंद्र कदम, राज विजय कदम आणि गणेश मच्छिंद्र साबळे (सर्व रा. शिवथर) यांनी फिर्यादी शशिकांत भंडलकर, त्यांचा मित्र राहुल मच्छिंद्र बोडरे आणि तुषार रामचंद्र साबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरून वरील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या