अनिल गोसावी हे १९९१ साली पोलीस दलाच्या सेवेत दाखल झाले होते. सुरूवातीला सातारा शहर पोलीस ठाण्यात डिटेक्टिव्ह ब्रँचला काम केल्यानंतर कराड शहर, महाबळेश्वर, कोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. सध्या ते रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. दि. २१ रोजी अनिल गोसावी यांना धाप लागू लागल्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून काम करणारे त्यांचे बंधू अजय गोसावी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
२१ ते २४ जुलैदरम्यान त्यांच्यावर तेथील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अनिल गोसावी यांचा सातारा जिल्हा पोलीस दलात कबड्डीपटू म्हणून नावलौकिक होता. याआधी वाई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजानन हणमंत ननावरे यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाने गोसावी यांच्या रूपाने दुसरा योध्दा गमावल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या