बंदी आदेश असतानाही प्रार्थना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | 11.08.20 | Today's Marathi Live News On Corona in Satara, Maharashtra |


सातारा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक प्रार्थनास्थळे, मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश असतानाही सातारा तालुक्यातील नागठाणे येथे मंदिरात एकत्रित प्रार्थना केल्याप्रकरणी बेघरवस्तीमधील १५ जणांसह अज्ञात २० लोकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतचे वृत्त असे, नागठाणे येथील बेघर वस्तीतील श्री महालक्ष्मी देवीची पूजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी मंदिरात जमाव जमवून देवीची पूजा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच जमावाची पांगापांग झाली. पोलिसांनी याप्रकरणी प्रवीण अण्णा पाटोळे, वनिता विकास पाटोळे, उज्ज्वला राजेंद्र पाटोळे, अण्णा पाटोळे सूरज संजय पाटोळे, सागर दिलीप पवार, विजय पतंगराव पवार, मंदा संजय पाटोळे, मालन पाटोळे, अनिता अरुण पाटोळे, मंगल संजय पवार, चतुरा जगन्नाथ पाटोळे, संगीता बाळू पाटोळे, मनोज बाळू पाटोळे (सर्व रा. बेघरवस्ती, नागठाणे) व अनिता माई उर्पâ अनिल मारुती जाधव (रा. सैदापूर, सातारा) यांना ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या