सातारा : समाजातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या मनोबल या आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनचे लोकार्पण प्रसिद्ध अभिनेत्री आणि संवेदनशील लेखिका सोनाली कुलकर्णी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाला पाठबळ देणारे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अभय नेवगी आणि प्रसिद्ध उद्योजक विजय पुसाळकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सोनाली कुलकर्णी म्हणाल्या,
मानसिक आरोग्यासाठी
परिवर्तनने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे. जेव्हा जीवन नकोसे वाटतं,
आत्महत्या करावी वाटते त्या क्षणाला ती आत्महत्या
रोखण्यासाठीची मदत महत्त्वाची
आहे. आपले
दुःख ऐकून
घेण्यासाठी कुणीतरी आहे ही भावना सुखद असते. लॉकडाउन
काळात सगळेच वेगवेगळ्या
समस्यांनी हवालदिल झालेत.
या पार्श्वभूमीवर ही हेल्पलाइन
महत्त्वपूर्ण ठरेल. आपल्याला लागल्यावर जखमेवर आई फुंकर मारते,
तेव्हा जरा बरं
वाटतं तसं या हेल्पलाइनच्या माध्यमातून मनावर फुंकर घातल्याने बरं वाटेल. बदलत्या
काळात आव्हान आहेत,
त्याला सामोरं जायला हवं.
उद्या नवा दिवस येणार
आहे.
सगळे भेदभाव विसरून ज्यांना आयुष्य निरुपयोगी
वाटते त्यांच्या
आयुष्यात आपण चांगल्या अर्थाने थोडं नाक खुपसू या व आयुष्य खूप
सुंदर आहे ते
चांगलं जगूया असे त्यांना सांगूया.
प्रसिद्ध
उद्योजक विजय पुसाळकर यांनी मार्गदर्शन करताना स्वतःचा अनुभव
सांगितला. लहानपणी
अपघाताने हात दुखावला.
पण डाव्या हाताने सर्व कामे करायला शिकलो व
करत आहे. आपण नेहमी सकारात्मक राहा,
कोणत्याही गोष्टीत मला हे शक्य आहे असा
विश्वास ठेवावा. अपयश आले तर आईवडील,
मित्रांशी बोला.
परिस्थितीतून मार्ग निघतो,
असेही त्यांनी सांगितले.
अभय नेवगी यांनी
सांगितले, की लॉकडाऊन चालू झाल्यावर कायद्याचा
सल्ला मागण्यापेक्षा वयक्तिक
प्रश्नासाठी मानसिक सल्ला मागण्यासाठी फोन येऊ लागले. आज
काम नाही उद्याचे भविष्य
काय असे प्रश्न लोकांना भेडसावू लागले. त्यांना मानसिक ताणातून बाहेर
काढण्यासाठी आधार देणे गरजेचे आहे. म्हणून ही हेल्पलाइनची
कल्पना सुचली.
परिवर्तनच्या माध्यमातून ही सुरू होत आहे ही चांगली गोष्ट आहे. हळू हळु
अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. थोडा संयम ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला.
परिवर्तन संस्थेचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी प्रास्ताविक
करताना या हेल्पलाइनची गरज व स्वरूप स्पष्ट केले. ही हेल्पलाईन पुणे
व सातारा जिल्ह्यातील लोकांसाठी 24 तास
उपलब्ध असेल असे सांगितले. पुढच्या टप्प्यामध्ये
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील ही हेल्पलाईन कार्यान्वित केली जाणार
असल्याचे त्यांनी सांगितले. परिवर्तनतर्फे
बोलताना डॉ.
सुदीप्तो चटर्जी ह्यांनी देशभरात दर वर्षी दोन लाखपेक्षा अधिक आत्महत्या
होतात ह्या मधील अनेक मृत्यू आपण टाळू शकतो. कुणाच्या
मनात असे विचार येत असतील तर त्यांनी कोणतीही भीड न बाळगता हेल्प लाईनला फोन करावा.
आपली माहिती पूर्ण गोपनीय ठेवली जाईल हे सांगितले. आत्महत्या प्रतिबंधासाठी ची हेल्पलाईन
क्रमांक 7212040300 याची मदत गरजूंनी
घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन रेश्मा कचरे यांनी केले.
तांत्रिक बाजू कृतार्थ शेवगावकर ह्यांनी सांभाळले तर आभार रूपाली भोसले यांनी मानले.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या