हिंदकेसरी मारूती माने (भाऊ) हे नव्या पिढीपेक्षा मागील दोन पिढ्यांना आपल्या कुस्तीतील करामतीने सर्वश्रुत आहेत. या लाल मातीतल्या ढाण्या वाघाचा पराक्रम आजच्या पिढीसमोर आणण्याच्या हेतूने कॅनडास्थित सुनिल मंत्री यांनी दोन वर्षांहून जास्त काळ हिंदकेसरी मारुती माने यांची माहिती गोळा केली. माने यांचे कुटुंब, त्यांचा परिवार, मित्र मंडळी, गाव, सहकारी, प्रेक्षक यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कुस्तीबद्दल माहिती घेतली. सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, पुणे, मुंबई, दिल्ली आणि इतर ठिकाणी भेट देऊन सर्व माहिती गोळा केली आहे. ही माहिती आता पुस्तक रूपात प्रकाशित करणार आहेत. करोनामुळे सध्या प्रकाशन काही दिवसांनी केले जाणार आहे.
येत्या १५ ऑगस्टचे औचित्य साधून पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकासोबत माने यांच्या आयुष्यावरील मराठी चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून चित्रपटात मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक ज्येष्ठ कलाकार काम करणार आहेत अशी माहिती सुनील मंत्री यांनी दिली.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या