सातारा : कोरोनाच्या संकटातून जात असताना सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत धक्कादायक वृत्त रात्री उशीरा हाती आले आहे. रात्रीच्या या अहवालामध्ये सातारा जिल्ह्यात आजवरचे सर्वात जास्त ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्याने कोरोना बाधितांचा दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी व्हावेत म्हणून रावापासून रंकापर्यंत सर्वचजण रात्रंदिवस देवाचा धावा करत आहेत. पण समोर येत असलेले वास्तव त्याच्या विपरित आहे. दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. दिवसागणिक बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांचे टेन्शन वाढत आहे. रूग्णांना बेड अपुरे पडत असल्याचे सांगितले जात आहे. गेले आठवडाभर तीनशे - साडेतीनशेच्या सरासरीने रूग्ण वाढत असताना आज रात्री उशीरा अचानक ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे.
नवीन वाढलेल्या बाधितांमध्ये कोणत्या तालुक्यातील किती हा तपशील सोमवारी सकाळी उपलब्ध होणार आहे. आता जिल्हावासीयांच्या नजरा त्या सविस्तर तपशीलाकडे लागल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या
आजच्या ताज्या बातम्या


0 टिप्पण्या