सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ७ कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील धास्ती कायम आहे. परंतु जिल्ह्यात रिकव्हरी रेटही सुधारला असून आज दिवसभरात २८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आजअखेर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ हजार ५९३ पर्यंत गेला असून कोरोना बळींचा आकडा २४९ वर गेला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये...
फलटण तालुका : फलटण शहरातील मंगळवार पेठेतील ३, लोहार गल्ली २, रविवार पेठ १, मारवाड पेठ १, निंभोरे १, साखरवाडी २, विडणी १.
वाई तालुका : वाई शहरामधील रविवार पेठेतील न्हावी आळी १, सुरुर १, बेलमाची ३, जेधेवस्ती वारागडेवाडी, भुईज २, धर्मपुरी १, कोंढवली ४.
सातारा तालुका : सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी २, आकाशवाणी झोपडपट्टी १, शाहूनगर १, गुरुवार पेठ ९, सातारा ७, दुर्गापेठ ३, शनिवार पेठ २, मंगळवार पेठ २, गुरुवार परज १, मल्हारपेठ १, यादोगोपाळ पेठ २, जानाई कॉलनी १, फडतरवाडी २, खेड २, गोखलेनगर १, भादवडे १, धनगरवाडी १, भरतगाववाडी १, पाटखळ १, खोडद १, पीरवाडी १, नागठाणे ५, धावडशी ३, विकासनगर ९, कोडोली १, गोडोली १, संगमनगर १, आरफळ १, कण्हेर १, समर्थनगर १, अतित १, ब्राह्मणवाडी (तासगाव) १, चिंचणेर निंब २.
कराड तालुका : कराड शहरातील आझाद चौक १, कापील २, रेठरे बुद्रुक १, कराड ४, गोटे १, मलकापूर १, प्रकाशनगर १, शिरवडे १, होळ २, उंब्रज १, जखिणवाडी २, सैदापूर १.
पाटण तालुका : ढेबेवाडी १४, पाटण २, धामणी १, कडवे बुद्रूक १, बनपुरी १, मोरेवाडी-मालदन १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ५, गोगवे २७, नगरपालिका ८, डॉ. साबणे रोड २, देवळी मुरा ३, तळदेव ४.
कोरेगाव तालुका : गोगावलेवाडी १, आसनगाव ४, कोरेगाव ४, कुमठे १, पिंपोडे बुद्रुक १.
खटाव तालुका : तडवळे १.
माण तालुका : म्हसवड १.
जावली तालुका : मोरघर ८, मेढा ४, एरणकरवाडी २, रिटकरवाडी १, दापवडी १.
खंडाळा तालुका : वडवाडी ३, पारगाव खंडाळा २, शिरवळ १, पाडळी १, धावडवाडी १, गोटमाळ लोणंद २, पळशी २.
जिल्ह्यातील ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सातारा येथील केसरकर कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष, कराडातील शनिवार पेठेतील ५५ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर (ता. कराड) येथील ७० वर्षीय महिला, म्हसवड (ता. माण) येथील ८० वर्षीय पुरुष, धामणी (ता. पाटण) येथील ५५ वर्षीय पुरुष तसेच साताNयातील खाजगी रुग्णालयात ओंड (ता. कराड) येथील ७९ वर्षीय पुरुष व पाटखळ (ता. सातारा) येथील ६६ वर्षीय महिला अशा एवूâण ७ कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे
२८३ जणांना डिस्चार्ज, तर ६७२ जणांचे नमुने तपासणीला
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २८३ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये जावली तालुक्यातील २८, कराड तालुक्यातील ७३, खंडाळा तालुक्यातील २८, खटाव तालुक्यातील १४, कोरेगांव तालुक्यातील २०, महाबळेश्वर तालुक्यातील ५, माण तालुक्यातील १, पाटण तालुक्यातील ९, फलटण तालुक्यातील १८, सातारा तालुक्यातील ५२, वाई तालुक्यातील ३५ नागरिकांचा समावेश आहे. तर ६७२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा अपडेट
- घेतलेले एकूण नमुने - ३६,६८७
- एकूण बाधित - ७,५९३
- घरी सोडण्यात आलेले - ४,२२३
- मृत्यू - २४९
- उपचारार्थ रुग्ण - ३,१२१
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या