स्वातंत्र्य दिनी माऊली रक्तपेढीत रक्तदान करण्याचे आवाहन

सातारा : प्रतिवर्षी स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी मॉडेल डेव्हलपर्सच्या वतीने सातारा येथील राधिका संकुलमध्ये घेण्यात येणारे रक्तदान शिबिर यावर्षी होणार नाही. मात्र इच्छुक रक्तदात्यांनी माऊली रक्तपेढी येथे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन विश्वस्त व पदाधिकाऱ्यांंनी केले आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र रक्ताची गरज पूर्वीएवढीच किंबहुना वाढली आहे. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी राधिका संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असे. मात्र सद्यस्थितीत ते शक्य नसल्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी माऊली रक्तपेढी, ५२९ ब / १, पारसनीस कॉलनी, पेंढारकर हॉस्पिटलमागे, सदरबझार, सातारा येथे दूरध्वनीवरुन संपर्क साधून रक्तदानासाठी यावे असे आवाहन माऊली रक्तपेढीच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांंनी केले आहे. रक्तदान शिबिरात सोशल डिस्टन्स पाळण्यासह शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून इच्छुक रक्तदात्यांनी अवश्य रक्तदान करण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे आपणास येताना सायन्स कॉलेजमार्गे डॉक्टर पेंढारकर यांच्या हॉस्पिटलसमोरून रक्तपेढीत यावे लागेल असे पदाधिकाऱ्यांंनी सांगितले आहे.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या