कोयना धरणाचे दरवाजे अद्याप १० फुटांवरच; पाटणमध्ये पडझड | Latest Marathi News

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र अद्यापही कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याने तिसरया दिवशीही कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांवर स्थिर असून त्यातून ५३ हजार ३८६ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ५५ हजार ४८६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरूच ठेवण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. मात्र कोयना नदीवरील मेंढेघर, नेरळे, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव आणि निसरे फरशी पूल अद्यापही पाण्याखाली असल्याने नदीपलीकडील गावे संपर्वâहीनच आहेत. संततधार पावसामुळे पाटणमधील विक्रमनगर येथील एका घराची भिंत सोमवारी कोसळली. 

गेल्या आठ दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या विविध विभागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. त्यामुळे कोयना धरणातील निर्धारित पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे रविवारी (दि. १६) टप्प्याटप्प्याने १० फुटांपर्यंत उघडून विसर्ग सुरू केला होता. मंगळवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे आज तिसरया दिवशीही धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांवर स्थिर ठेवून कोयना नदीपात्रात ५५ हजार ४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.

कोयना नदीच्या पाणीपातळीत थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. मात्र कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने नदीवरील सर्वच पूल सलग तिसरया दिवशी पाण्याखालीच आहेत. त्यामुळे नदीपलिकडील गावांचा पाटणशी संपर्क नाही. पाटण शहरातील स्मशानभूमी, मार्केट यार्ड परिसरातील पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाटणमधील विक्रमनगर येथील अभिजीत बाळासाहेब यादव यांच्या राहत्या घराची भिंत सोमवारी कोसळली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचा पंचनामा पाटणचे मंडल अधिकारी, तलाठी यांनी केला आहे.

कोयना धरणात ९१.९५ टीएमसी पाणीसाठा

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाNया कोयना धरणात आजच्या घडीला ९१.९५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण ८७.३७ टक्के भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे ३५ मिलिमीटर (३६३०), नवजा १४ (४०९७), महाबळेश्वर २७ (४०१५) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या