वाईमध्ये गणेश विसर्जनासाठी काढण्यात आला आहे ‘हा’ आदेश | Latest Marathi News

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता वाई शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे कृष्णा नदी पात्रात विसर्जन करण्यास नगरपालिका प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

वाई शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणेश विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना गेली अनेक वर्षे नगरपालिका विविध संघटनांच्या माध्यमातून राबवत आहे. त्याच धर्तीवर यंदाही नदीपात्रात गणपती विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती संकलित करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 

या सर्व मूर्तींचे नगरपालिकेच्या वतीने विधिवत व योग्य पावित्र्य राखून विसर्जन केले जाणार आहे. ज्यांना घरी शक्य आहे त्यांनी घरीच विसर्जन करावे व ज्यांना घरी शक्य नाही, त्यांनी आपल्या गणेशमूर्ती नगरपालिकेकडे दान करून सहकार्य करावे, अशी विनंती नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्या पोळ आणि नगरसेवकांनी केली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या