राज्यातील वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार; ऊर्जामंत्र्यांची ग्वाही | Latest Marathi News


मुंबई :
विद्युत कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्यांबाबत आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासमवेत फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्राधारी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेतल्या. या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी दिले.

कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्धे बनून वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत वीज कर्मचाNयांचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले. तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत मांडलेल्या मुद्यांबाबत विचार करुन अडचणी सोडवण्याची ग्वाही डॉ. राऊत यांनी यावेळी दिली. 

मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, फ्रेंचाईजी धोरण, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे, निवृत्तीवेतनधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा व मागणी करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ राऊत यांनी यावेळी दिले.

कोरोना कालावधीत सर्व वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा दिली. त्या सर्व कोविड योध्यांचे आमदार भाई जगताप यांनी कौतुक केले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर पवनकुमार गंजु व विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या