‘जेईई आणि नीट’ झालीच पाहिजे ही तर विद्यार्थ्यांची इच्छा; केंद्रीय मंत्र्यांचा अजब तर्क


नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे तूर्त जेईई आणि नीट परीक्षेची जोखीम घेऊ नये अशी भूमिका देशभरातून मांडली जात असताना केंद्र सरकार मात्र या परीक्षा घेण्यावर ठाम आहे. अशा स्थितीत या परीक्षांसाठीची प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेण्याच्या संख्येचा हवाला देऊन, काहीही झाले तरी या परीक्षा झाल्याच पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची इच्छा असल्याचा अजब तर्क केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मांडला आहे.

देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून अशा संकटाच्या काळात जेईई आणि नीट परीक्षा घ्यावी की नको याबाबत मतमतांतरे आहेत. ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी देशातील अनेक राज्यांनी केली आहे. मात्र केंद्र सरकार परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यावर अडून बसले आहे. यासंदर्भात पोखरियाल यांनी उपरोक्त तर्क मांडला आहे. एनटीएच्या संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांपैकी साडेसात लाख विद्यार्थ्यांनी तसेच नीटच्या १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांपैकी १० लाख क्षात प्रवेशासाठी आवश्यक असलेली आपली प्रवेशपत्रे डाऊनलोड केली आहेत. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. आता काही झाले तरी परीक्षा व्हावी हीच विद्यार्थ्यांची इच्छा दिसते, असे पोखरियाल यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा केंद्रांची संख्या आता ५७० वरुन वाढवून ६६० करण्यात आली आहे. तर नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची संख्या २ हजार ५४६ वरुन ३ हजार ८४२ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही रमेश पोखरियाल यांनी सांगितले. आता जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - बाळासाहेब थोरात

केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेला काँग्रेससह विविध पक्षांनी कडाडून विरोध केला असून त्यासाठी आज राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याची हटवादी भूमिका घेऊन केंद्र सरकार विद्याथ्र्यांना संकटात ढकलत आहे. त्यांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या