आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या माहीच्या भवितव्याविषयी अलीकडे बऱ्याच चर्चा झडत होत्या. त्या सर्व चर्चांना त्याने आज इन्स्टाग्रामवर ‘मै पल दो पल का शायर हू, पल दो पल मेरी कहानी है’ या गीताच्या धर्तीवर व्हीडीओ शेअर करून विराम दिला. जुलै २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने विश्वचषकातील शेवटचा सामना खेळला होता. आयसीसीतर्फे आयोजित वन डे, टी २० चा विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी हे तिन्ही चषक जिंकून देणारा तो जगातील एकमेव यशस्वी कर्णधार ठरला आहे. तसेच कर्णधारपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक सामने जिंकण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याने अशाच पध्दतीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर आज त्याने टी २० आणि वन डे क्रिकेटलाही अलविदा केले. दरम्यान, तो आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या