Breaking News... सातारा जिल्ह्यात २२६ जणांना डिस्चार्ज; पण आणखी ४६ रूग्ण वाढले | Latest Marathi News

सातारा : सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात २२६ जण खडखडीत बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ हजार ४४९ झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग समाधानकारक असल्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या अहवालानुसार आज ४६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून, ७४३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

विविध रुग्णालयातून आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील ५, कराड तालुक्यातील ४१, खंडाळा तालुक्यातील २७, खटाव तालुक्यातील ३, कोरेगाव तालुक्यातील २०, महाबळेश्वर तालुक्यातील २६, माण तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील २१, फलटण तालुक्यातील २६, सातारा तालुक्यातील २९, वाई तालुक्यातील २६ नागरिकांचा समावेश आहे.

४६ जणांचा अहवाल कोरोना बाधित

जावली तालुका : भणंग येथील १, कुडाळ ३, खर्शी १, मोरघर १.

कराड तालुका : चोरे येथील १.

खंडाळा तालुका : शिरवळ येथील २, स्टार सिटी येथील १, सुंदर नगरी येथील १.

खटाव तालुका : अंबवडे येथील १, गुरसाळे येथील १, मायणी येथील १.

कोरेगांव तालुका : कुमठे येथील १, सोनके येथील १, अपशिंगे येथील १, सोळशी येथील १.

माण तालुका : भालवडी येथील १.

पाटण तालुका : सणबूर येथील १, पुरफोळे येथील १.

फलटण तालुका : मारवाड पेठ येथील १, सोमवार पेठ १, रविवार पेठ १, विडणी १, रिंगरोड १, खाटीक गल्लीr ७, मलठण येथील २.

सातारा तालुका : गावडी येथील १, मालगाव १, कोडोली १, संभाजीनगर १, कामाठीपुरा १, रामचौक १, नेले १, गणेश कॉलनी १. मंगळवार पेठ येथील १.

वाई तालुका : उडतरे येथील २.

सातारा जिल्हा अपडेट

  1. घेतलेले एकूण नमुने - ३७,४३०
  2. एकूण बाधित - ७,९२९
  3. घरी सोडण्यात आलेले - ४,४४९
  4. मृत्यू - २६०
  5. उपचारार्थ रुग्ण - ३,२२०

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या