Breaking News... सातारा जिल्ह्यात आता औषध दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार | Latest Marathi News


सातारा :
अत्यावश्यक सेवेमध्ये असूनदेखील लॉकडाऊनमुळे गेले काही महिने वेळेच्या बंधनात अडकलेली सातारा जिल्ह्यातील औषध दुकाने आता पूर्णवेळ सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. 

कोरोना संसर्गाच्या धास्तीने सर्वच क्षेत्रांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली औषध दुकाने, किराणा दुकाने आदी उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र त्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले होते. कडक लॉकडाऊनच्या काळात सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत औषध दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. त्यानंतर ही मर्यादा सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत वाढवण्यात आली. आता जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार सातारा जिल्ह्यातील औषधांची दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास दि. २७ ऑगस्टपासून परवानगी दिली आहे.

मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासारख्या व्याधी असणाNया रूग्णांना नियमित औषधे घ्यावी लागतात. तसेच अचानकपणे आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाNया संकटावेळी तात्काळ औषधे मिळावी लागतात. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे रूग्णांची हेळसांड झाली. आता दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्यास अनुमती मिळाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या