वाई मतदारसंघातील कोरोना बाधितांना जपण्यासाठी इंजेक्शन बँक | Latest Marathi News

सातारा : कोरोनावर जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्या भागातील कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्शन्स महागडी असल्याने सर्वसामान्यांना ती घेणे परवडत नाही. यासाठी महाबळेश्वर - वाई - खंडाळा मतदारसंघात इंजेक्शन बँक करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

गरजू रुग्णांसाठी इंजेक्शन्स मोफत उपलब्ध करून देण्याची भूमिका पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात पाचशे इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतीने ४१ इंजेक्शन्स दिली आहेत. वाई शहरातील व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंडळेही ५० इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे वाई जैन समाजाने २५ इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. वाई - खंडाळा - महाबळेश्वर मतदारसंघातील अनेक घटक पुढे आले असून ते या कामात योगदान देत आहेत. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मदत करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केल्यानुसार महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्शन आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाडकर, उपाध्यक्ष रोहित ढेबे, संजय जंगम, संदीप मोरे, अनिकेत रिंगे व दीपक ओसवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ही इंजेक्शन महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाहीत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स पाठवली आहेत. 

मतदारसंघात दररोज ५० ते १०० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा पुणे, मुंबई, सोलापूरशी संपर्क होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतो. सध्या वातावरणातील बदल व चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्यायाने वाढत आहे. यासाठी मतदारसंघात ५०० इंजेक्शन्स बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. माझ्या वाईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी तर गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेत कोरोना औषध बँक हा अभिनव उपक्रम राबविला आहे. कार्यकर्त्यांनीही कोरोनासाठी मदतीचा हात दिला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या