दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आणि तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स या संघामागील धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. आता संघाचा उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाही अचानकच स्पर्धेतून माघार घेऊन संयुक्त अरब अमिरातमधून मायदेशी परतल्याने संघाला आणखी एक धक्का बसला आहे. या नव्या बातमीने चेन्नई संघाच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा ३३ वर्षीय सुरेश रैना चेन्नई संघातील एक अनुभवी खेळाडू आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्रापासून चेन्नईचा अविभाज्य भाग राहिलेल्या रैनाने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. नुकत्याच चेन्नईत पार पडलेल्या आयपीएल सराव शिबिरातही सुरेश रैना सामील झाला होता. तेथूनच तो संघासोबत दुबईला रवाना झाला होता.
शनिवारी सकाळी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी ट्विट करून सुरेश रैना मायदेशी परतल्याचे वृत्त दिले. वैयक्तिक कारणांमुळे तो भारतात परतला असून आयपीएलच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, संघाच्या स्टाफमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच सध्याच्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाजही कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे वृत्त कालच समोर आले आहे. या एकामागोमाग बसत असलेल्या धक्क्यांमुळे चेन्नई संघाच्या चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या