सातारा शहरातील इमारतींच्या बाबतीत परवानगी एक, बांधकाम भलते | Latest Marathi News


अनधिकृत, दर्जाहीन कामांकडे वेधले शिवसेनेने लक्ष
सातारा : सातारा शहरात अनेक इमारती अनधिकृत आहेत. काही इमारतींच्या बाबतीत परवानगी वेगळी आणि बांधकाम भलतेच सुरू असते. शहरात बेकायदा टपऱ्या आहेत. अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी मुख्याधिकारी म्हणून कार्यवाही करावी तसेच शहरात होणारी दर्जाहीन कामे रोखण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे.
अभिजित बापट यांनी नुकताच मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांची भेट घेऊन शिंदे यांनी शहरातील अतिक्रमणांबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक मनोज शेंडे, अविनाश कदम उपस्थित होते. मुख्याधिकारी म्हणून तुम्हाला सातारा शहर नवीन नाही. रस्त्याची कामे खराब दर्जाची होत आहेत. कामे पूर्ण करण्याआधी बिले काढली आहेत. मोती चौकात पेव्हर टाकले. पूर्वीचे पेव्हर काढण्याचे कारण कळत नाही. कोरोनाच्या काळात अनेक चुकीच्या बाबी नगरपालिका प्रशासनाकडून घडत आहेत. याबाबत निवेदन देऊनही कार्यवाही झाली नसल्यामुळे आता तुमच्याकडून कार्यवाही होण्याची अपेक्षा असल्याचे शिंदे यांनी मुख्याधिकारी बापट यांना सांगितले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.

आजच्या ताज्या बातम्या  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या