सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनी सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे १ पूâट ९ इंचाने उचलून कोयना नदीपात्रात ९ हजार ५८२ क्युसेक आणि धरण पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून एवूâण ११ हजार ६८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धुवाँदार पाऊस व धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयनेची वाटचाल धोकापातळीकडे चालली असून नदीवरील संगमनगर धक्का व निसरे पूल पाण्याखाली गेले आहेत.
१०५.२५ टीएमसी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या ८६.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने पाटण तालुक्यासह कराड, सांगली परिसरातील कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्वâतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाची पाणीपातळी शनिवारी सकाळी २१४७.११ पूâट झाली आणि पाणीसाठा ८६ टीएमसी झाल्यामुळे धरणातील निर्धारित पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ पूâट ९ इंचाने उचलून कोयना नदीपात्रात ९ हजार ५८२ क्युसेक आणि धरण पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून एवूâण ११ हजार ६८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचे वाढते प्रमाण आणि विसर्ग यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले असून कोयनेमाईने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. धरणातून विसर्ग सुरू केल्यानंतरही पाणलोट क्षेत्रात दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. परिणामी पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचे प्रमाण असेच वाढत गेल्यास कोयनेतून सुरू असलेला विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचर्यंत कोयनानगर येथे ३२ (३१७९) नवजा ३३ (३४८२) आणि महाबळेश्वर येथे ५५(३५६०) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या