सातारा जिल्ह्यात मृत्यूचे तांडव; रूग्णसंख्याही ७ हजारपुढे | Latest Marathi News

सातारा : वाढते रूग्ण आणि वाढत्या मृत्युंनी सातारा जिल्हावासीयांची झोप उडवली आहे. कोरोनाने जिल्ह्यात कालपासून उच्चांकी १६ जण दगावले असून कोरोनामुळे झालेल्या मृत्युंचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. तसेच शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७ हजार ३४३ पर्यंत पोहोचला आहे.

वाढलेल्या नवीन बाधितांमध्ये...

सातारा तालुका : सातारा शहरातील मंगळवार पेठ ७, सातारा पोलीस स्टेशन २, राजमाता सुमित्राराजे कॉलनी, शाहूनगर २,  शुक्रवार पेठ १, देवी चौक १,  प्रतापगंज पेठ १, बुधवार नाका २, सर्वâल हाऊस २,  बुधवार पेठ १, सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर (सातारा) २,  गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी २, शाहूपुरी १, गोडोली १, लिंबाचीवाडी (नंदगाव) १,  चिंचणेर निंब २, पिरवाडी १, डबेवाडी १, अतित १, शहापूर १, कोडोली १,  काशिळ १, सातारा १, सातारा शहर २.

कराड तालुका : कराड शहरातील मंगळवार पेठ ४, सोमवार पेठ ६, कापील २, शनिवार पेठ ८, रविवार पेठ ३, बुधवार पेठ १, कार्वे नाका ३, सह्याद्री हॉस्पिटल १, मलकापूर १, गजानन हौसिंग सोसायटी १, पाल १, मसूर २, नांदगाव १, वारुंजी विमानतळ १, कुसुर १, विद्यानगर १, ओंड ४,  सैदापूर १, चचेगाव १, कोपर्डे हवेली १, जखिणवाडी १, शिरवडे १, कराड ५.

फलटण तालुका : फलटण १, मलठण १, मांडव खडक १.

वाई तालुका : वाई शहरातील रविवार पेठ ११, वाशिवली १, सह्याद्रीनगर ४, यशवंतनगर ३, नवेचीवाडी ३, ब्राह्मणशाही २, पुâलेनगर ६, सिध्दनाथवाडी २, दत्तनगर १, सोनगिरवाडी ३, बावधन १, रामडोहाळी २, चिखली १.

पाटण तालुका : माजगाव २, पाटण ८, मल्हारपेठ २, मारुल हवेली ६, ढेबेवाडी ३, सणबूर १, गारवडे २.

महाबळेश्वर तालुका : गवळी मोहल्ला महाबळेश्वर २.

कोरेगाव तालुका : कुमठे ११, कोरेगाव पोलीस स्टेशन २, चवणेश्वर (करंजखोप) ३, खाटीक गल्ली,  रहिमतपूर १०, चिंचेचा मळा, रहिमतपूर १, वाठार किरोली १.

खटाव तालुका : मोराळे २, वडूज २, पुसेगाव १, मायणी २, डांभेवाडी ३, राजाचे कुर्ले ४.

माण तालुका : भालवडी ३, म्हसवड १.

जावली तालुका : मोरघर १.

खंडाळा तालुका : मारुती मंदिराजवळ, वाण्याचीवाडी १.

इतर जिल्हा : किणी (जि. कोल्हापूर) येथील १, काळमवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) २, अंबक (ता. कडेगाव, जि. सांगली), डोंबिवली येथील प्रत्येकी १.

१६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे कणूर (ता. वाई) येथील ८० वर्षीय पुरुष, वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील ८५ वर्षीय महिला, गोडोली (ता. सातारा) येथील ८० वर्षीय महिला, खोडद (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय पुरुष, केसे (ता. कराड) येथील ६४ वर्षीय पुरुष, विंग खंडाळा येथील ७३ वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील ६५ वर्षीय महिला, तर विविध खाजगी रुग्णालयात कराडमधील मंगळवार पेठेतील ६८ वर्षीय पुरुष, सणबूर (ता. पाटण) येथील ७० वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील ५१ वर्षीय पुरुष, नवेचीवाडी (ता. वाई) येथील ५५ वर्षीय पुरुष, साताNयातील मंगळवार पेठेतील ६१ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील ७३ वर्षीय महिला, गडकर आळीतील ५७ वर्षीय पुरुष, पुâलेनगर (ता. वाई) येथील ५५ वर्षीय पुरुष, ढेबेवाडी (ता. पाटण) येथील ८३ वर्षीय पुरुष अशा एवूâण १६ कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या