खुद्द शरद पवार यांनी सातारकरांना दिलेल्या मदतीत झोल | Latest Marathi News

सातारा : सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाला आवर घालण्यासाठी परवाच (दि. ९ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराडला धाव घेऊन उपाययोजनांना गती दिली होती. त्यावेळी खुद्द शरद पवार यांनी जिल्ह्यासाठी दिलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या मदतीमध्येच झोल झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हावासीयांमध्ये प्रचंड संतापाची भावना उफाळून आली आहे. संकटाच्या काळातही अशा पध्दतीने डल्ला मारणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढा अशी मागणी होत आहे.

९ ऑगस्ट रोजी खासदार शरद पवार यांनी अत्यंत सहृदयतेतून जिल्ह्यासाठी मदतीचा हात म्हणून रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा साठा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला होता. ही इंजेक्शन्स गरिबांना द्यावीत असे सूचित करण्यात आले होते. मात्र, ती नेमकी कुठल्या रुग्णांना दिली गेली याबाबत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा विचारूनही माहिती दिली जात नसल्याची तक्रार झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

खासदार शरद पवार यांनी ही इंजेक्शन्स गरिबांसाठी दिली होती. मात्र या जीवनदायी इंजेक्शनचा गैरवापर झाल्याचा संशय आहे. कोविड वॉर्डमधून या इंजेक्शनची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील अनेक इंजेक्शन्स रुग्णालयातून परस्पर लंपास करून चढ्या किंमतीने बाहेर विकली गेल्याची तक्रार होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १७५ इंजेक्शनचे रेकॉर्ड जाहीर करावे आणि रेकॉर्डमध्ये दोशी सापडतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत होती. या इंजेक्शनबाबत असलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या