सातारा जिल्ह्यात रूग्णवाढ चिंताजनक; मृत्यूसत्रही सुरूच | Latest Marathi News

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. कोरोना रूग्णांसोबत मृत्यूसत्रही सुरूच आहे. मृत्युचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २९० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ८ हजारच्या समीप पोहोचला आहे. तसेच ११ कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

नव्याने वाढलेले रूग्ण याप्रमाणे...

सातारा तालुका : सातारा २, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ १, सोमवार पेठ १, भवानी पेठ १, केसरकर पेठ १, पोलीसलाईन १, वाहतूक पोलीस १, राजसपुरा पेठ १, देशमुख कॉलनी १, गोडोली १, दौलतनगर १, कामाठीपुरा १, शाहूनगर २, तामजाईनगर १, नेले किडगाव १, खेड १, दरे बुद्रुक १, विलासपूर १, वडगाव १, अतित १५, वाढे ५, विकासनगर १, वळसे १, नंदगाव २, मल्हारनगर १, शिवथर १.

कराड तालुका : कराड १६, रविवार पेठ ५, सोमवार पेठ ६, मंगळवार पेठ ६, बुधवार पेठ ६, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ५, रुक्मीणीनगर २, सह्याद्री हॉस्पिटल १, कराड शहर पोलीस २, वाकन रोड ३, मलकापूर ११, सैदापूर ४, रेठरे कारखाना १, वडोली १, तासवडे १, आगाशिवनगर ३, वाठार १, नांदलापूर १, गोटे ३, आटके १, वडगाव १, काले १, एचडीएफसी बँक ७, विरवडे १, उंब्रज १, तळबीड २, चरेगाव १, शिवडे १, गोवारे १, मालखेड १, मसूर १, चोरे ६, वाघेरी ४, साळशिरंबे १, धोंडेवाडी १, कापील १, साकुर्डी २, कार्वे १, कालिदास मार्केट १, कोणेगाव १, टाळगाव १, गोळेश्वर १, बाबरमाची १.

फलटण तालुका : फलटण ४, मंगळवार पेठ १, लक्ष्मीनगर २, मारवाड पेठ ३, कसबा पेठ १, मलटण येथील १, मांडवखडक १, विडणी १, कोळकी १, तरडगाव १, ठकुबाची वाडी १, तावडी १, तामखाडा ४, जिंती १,  निंभोरे १, खेड बुद्रुक १, बिरदेवनगर १, गिरवी १.

वाई तालुका : रविवार पेठ २, गंगापुरी १, ब्राह्मणशाही २, कवठे १, उडतारे २, पांढNयाचीवाडी १, बावधन १२, पाचवड १, शेंदुरजणे २, धोम कॉलनी १, ओझर्डे कदमवाडी १.

पाटण तालुका : कालगाव २, पाटण ४, पंचमोरगिरी १, संघवाड १, दिवशी बुद्रुक १, दौलतनगर १.

महाबळेश्वर तालुका : बाह (पाचगणी) १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, नायगाव १, तहसील ऑफीस १, रहिमतपूर १.

खटाव तालुका : विसापूर १, मोराळे ३, वडूज १, विखळे १, वांझोळी ५, खटाव १, तडवळे २, उंबर्डे १, मायणी १, राजाचे कुर्ले १.

माण तालुका : म्हसवड ३, मासाईवाडी १.

जावली तालुका : सरताळे १, मेढा २, गांजे १, मोरघर १२.

इतर जिल्हा : चव्हाण वाडी, आष्टा (सांगली) १, रिळे (ता. शिराळा) १, किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) १.

जिल्ह्यात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सरताळे (ता. जावली) येथील ५६ वर्षीय महिला, बुधवार पेठ, कराड येथील ४८ वर्षीय महिला, गोडोली (सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, नेले (ता. सातारा) येथेील ७५ वर्षीय महिला, फलटण येथील ६० वर्षीय महिला व राजेवाडी निगडी (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरूष अशा एकूण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच कराड येथे खाजगी रुग्णालयात आंबेडकरनगर (पाटण) येथील ६९ वर्षीय पुरुष, वाई येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील ८० वर्षीय पुरुष व सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील ५१ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील ७६ वर्षीय पुरुष, गिगेवाडी (ता. कोरेगाव) येथील ६४ वर्षीय पुरुष असे एकूण पाच कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा अपडेट

  1. घेतलेले एकूण नमुने - ३६,६८७
  2. एकूण बाधित - ७,८८३
  3. घरी सोडण्यात आलेले - ४,२२३
  4. मृत्यू - २६०
  5. उपचारार्थ रुग्ण - ३,४००


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या