कृष्णा - कोयनेच्या पुराचा धोका तूर्त टळला; पण... Latest Marathi News

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटांवर, विसर्ग ११ हजार क्युसेकवर

सातारा : कोयना धरणाचे दहा पुâटांपर्यंत उचललेले सहा वक्र दरवाजे आज दीड पुâटांपर्यंत आणण्यात आले. त्यामुळे धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून कोयना व कृष्णाकाठचा पुराचा धोका तूर्त कमी झाला आहे. पण टळलेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अतिवृष्टी झाल्यास महापुराची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्यामुळे कोयनाकाठचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.  

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणातील पाण्याची आवक घटली आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद ३१ हजार ३७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आज धरणाचे सहा वक्र दरवाजे सकाळी ११ वाजता १० पुâटांवरून ५ पुâटांवर आणि त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दीड पुâटांवर आणण्यात आले आहेत. आता दरवाजातून ९ हजार २१३ आणि धरण पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक मिळून ११ हजार ३१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. 

विसर्ग कमी करण्यात आल्याने कोयना नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली असून कोयना नदीवरील मूळगाव व नेरळे पूल चार दिवसानंतर वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. पूर्वेकडील विभागातही पावसाचा जोर ओसरल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. सर्व ठिकाणी धोका पातळीच्या खाली पाणी पातळी आली आहे. अनेक पूल, बंधारे पाण्याबाहेर आले आहेत. काही ठिकाणी पाऊस व त्यामुळे नदी, ओड्यांना आलेल्या पुâगीमुळे आजूबाजूच्या शहर, गाव, नागरीवस्त्या व शेतांमध्ये घुसलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

आधी पुराने अडवले, नंतर झाडाने रडवले 

तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधी पूल पाण्याखाली गेल्याने आणि नंतर या झाडामुळे वाहतुकीपुढे विघ्न निर्माण झाले. बांधकाम विभागाने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.

धरणातील सरासरी आवक कमी झाल्याने एवूâण पाणीसाठ्यात थोडी घट झाली आहे. सध्या धरणात एवूâण ९१.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात आवश्यक तो पाणीसाठा करून आगामी काळातील पाऊस व त्यानंतरची पाणी सामावून घेण्याची क्षमता विचारात घेऊन त्यानंतरच सोडण्यात येणाNया पाण्याचे प्रमाण कमी अथवा जास्त  केले जाणार आहे. बुधवार सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत कोयनानगर येथे ११ मिलीमीटर (३६८७), नवजा १३ (४१८८), महाबळेश्वर २० (४११०) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

... तर विसर्ग कमी - जास्त होऊ शकतो

आगामी पूर्वतयारी व अजून दोन दिवस असलेला अतिवृष्टीचा संभाव्य इशारा लक्षात घेऊन धरण परिचलन सुचीप्रमाणे पाणीसाठा व पाणी आवक त्यापटीत कमी अथवा जास्त झाली तर धरणातून सोडण्यात येणाNया पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करण्यात येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे. 


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या