सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक - निंबाळकर यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती संजीवराजे यांनी स्वत: दिली.
मला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने मी स्वत:हून कोव्हिड - १९ ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, परंतु गेल्या पंधरा दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या फलटण शहर व तालुक्यातील सर्वांनी स्वत:ला सात दिवस होम क्वारंटाईन करावे आणि आठव्या दिवशी कोव्हिड - १९ ची चाचणी करून घ्यावी. आपण होम क्वारंटाईन झाल्याचे फलटण शहरातील नागरिकांनी नगरपालिकेत आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयात कळवावे, असे आवाहन संजीवराजे यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या