सातारा जिल्ह्यातील २९० जण कोरोनामुक्त; ८९२ नमुने पाठविले तपासणीला | Latest Marathi News

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २९० नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील ४, कराड तालुक्यातील ८२, खंडाळा तालुक्यातील २९, खटाव तालुक्यातील १३, कोरेगाव तालुक्यातील ३५, महाबळेश्वर तालुक्यातील ११, माण तालुक्यातील १, पाटण तालुक्यातील १३, फलटण तालुक्यातील १६, सातारा तालुक्यातील ४१, वाई तालुक्यातील ४५ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज ८९२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २०, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ८०, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील ५७, कोरेगाव ४७, वाई येथील ६९, खंडाळा येथील ९२, रायगाव २३, मायणी येथील ४९, महाबळेश्वर येथील २४, पानमळेवाडी ८८, पाटण येथील २२, दहिवडी ४०, खावली येथील १५७ व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथील १२४ जणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या