सातारा : सातारच्या प्रसिद्ध श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त बाळासाहेब तांबोळी यांनी दिली.
येथील सदाशिव पेठेतील सम्राट मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दरवर्षी गणेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरा करतात. हा गणपती नवसाला पावतो, अशी भक्तांची श्रद्धा असल्याने गणेशोत्सवात या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. या मंडळाची भव्य गणेशमूर्ती साताNयातील गणेशभक्तांचे आकर्षण असते. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंडळाच्या विश्वस्तांनी बैठकीत घेतला. मंडळात गणेशदर्शनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाच्या रकमेतून मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य शिबिरे, कोव्हिड योध्यांचा सत्कार, आरोग्य, सफाई कामगार, कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी आदिंना पीपीई किटस, मास्क व सॅनिटायझरचे वाटप आदी उपक्रमांचा समावेश असेल. सर्व गणेशभक्तांसाठी महागणपतीचे २४ तास ऑनलाईन दर्शन मिळणार असल्याचेही तांबोळी यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या