फलटण : फलटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार व वैद्यकीय सुविधा देण्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी लागेल, असा इशारा विधान परिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिला आहे.
फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक - निंबाळकर सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत रामराजे बोलत
होते. आमदार दीपक चव्हाण, इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ.
शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार
आर. सी. पाटील, नगर परिषद
मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकट धवन, डॉ. सुभाषराव गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, नगर परिषद आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सोनवलकर,
फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, शहरातील काही खाजगी डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो
असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर हे या
बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.
खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना सेवा द्यावी
फलटण शहर व तालुक्यातील खाजगी डॉक्टर्सनी आपल्या रुग्णालयातील काही भाग कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राखून ठेवावा व तेथील उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे फी आकारणी करुन त्यांना वैद्यकीय सेवा सुविधा द्यावी, त्याचप्रमाणे आपल्या रुग्णालयातील काही कॉट्स आयसोलेशनसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी रामराजे यांनी व्यक्त केली.
उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्र त्वरित कार्यान्वित करा
उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी घेण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत वाढवून जास्तीत जास्त चाचण्या घ्याव्यात, तसेच या रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेला २५ बेडचा कोरोना उपचार विभागात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा आणि ६ बेडसाठी आयसीयु सुविधा सोमवारपर्यंत उपलब्ध करुन देवून सदर कोरोना विभाग तातडीने कार्यान्वित करावा, अशा स्पष्ट सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
सप्टेंबरअखेर ४ हजार रुग्ण अपेक्षीत
इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी शहर व तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव व त्याच्या नियंत्रणासाठी तसेच बाधीत किंवा संशयीत रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोई सुविधांबाबत सविस्तर माहिती देवून सप्टेंबर अखेर तालुक्यात ४ हजार कोरोना रुग्ण आढळतील अशी अपेक्षा असल्याने त्यादृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. त्याचबरोबर सध्या असणारे रुग्ण व संशयीत यांच्यासाठी पुरेशी वैद्यकिय सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रशासन पूर्णवेळ कार्यरत असल्याची ग्वाही यावेळी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या