जिल्ह्यात २४० कोरोनामुक्त; तर ८०० जणांवर रिपोर्टची टांगती तलवार | Latest Marathi News


सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २४० नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील ४२, खंडाळा तालुक्यातील ११, खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव तालुक्यातील १८, महाबळेश्वर तालुक्यातील ४, पाटण तालुक्यातील ६, सातारा तालुक्यातील ३५, वाई तालुक्यातील २६ व इतर ८९ रूग्णांचा समावेश आहे. 

त्याचबरोबर स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ८, कराड ८१, फलटण उपजिल्हा रुग्णालय ७८, कोरेगाव ५३, वाई १०४, खंडाळा ९९, रायगाव ५४, पानमळेवाडी ८२, मायणी ३२, महाबळेश्वर ४५, पाटण २८, दहिवडी ३२ व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे १०४ अशा एकूण ८०० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या