डोळ्यादेखत बिबट्याने केला हल्ला; गावकऱ्यांत पसरली घबराट | Latest Marathi News

सातारा : रानात चारण्यासाठी नेलेल्या बकरीवर डोळ्यादेखत बिबट्याने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पाटण तालुक्यातील बादेवाडी (कुठरे) येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील रानात ही घटना घडली. या परिसरात बिबट्याचा सतत वावर असून बिबट्याच्या हल्ल्यांनी जनता त्रस्त आहे.

बकरीचे मालक बाळू चांदू साठे हे ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम करत आहेत. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोक प्रचंड संकटात आहेत. त्यात अशा गोष्टीमुळे ज्यांचा उदरनिर्वाह जोड व्यवसाय असलेल्या शेळी पालनावर आहे. त्यांच्यापुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. जनावरे चारण्यासाठी शुभम साठे, गणेश म्होप्रेकर, शंभूराज साठे हे गेले होते. बकरीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना डोळ्यासमोर घडल्याचे पाहिल्याने ही मुले प्रचंड घाबरली होती. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या रानात पळून गेला. आतापर्यंत पंधरा दिवसात घडलेली ही दुसरी घटना आहे. गेल्या चार महिन्यात अनेक जनावरांचा खात्मा बिबट्याने केला आहे. त्यामुळे वनविभाग प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. बादेवाडी, लोकरेवस्ती, शिंदेवस्ती व आसपासचे लोक जनावरे चारण्यासाठी जवळच असलेल्या शिवारात नेत असतात. या शिवारात जात असताना लोकांना वनविभागाच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे लोकांना तांत्रिक गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे या परिसरात लोकांमध्ये घबराट पसरली आहे. अशाच घटना घडत राहिल्या तर लोकांनी आपली उपजीविका कशावर करायची असा प्रश्?न लोकांच्या समोर उभा राहिला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या