बेकायदा बैलगाडी शर्यत ‘उधळली’, पीएसआयला दिले ढकलून | Latest Marathi News


बोरगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

सातारा : निसराळे (ता. सातारा) गावच्या हद्दीत बेकायदा बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी तसेच कोरोना संदर्भातील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत ही कारवाई करत असताना संशयित सागर मंगेश पवार (वय २४, रा. वर्णे, ता. सातारा) याने मोटर सायकल घेऊन जाताना डाळिंबकर यांना ढकलून देवून किरकोळ जखमी केले.

याप्रकरणी संशयित अमोल शंकर शिंदे (वय २७, रा. चरेगाव, ता. कराड), जालिंदर लक्ष्मण भोसले (वय ४०, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर मंगेश पवार, गौरव रणजीत पवार (वय १९), विश्वनाथ पांडुरंग पवार (वय १८), राहुल शिवाजी पवार (वय ३१), कुलदीप विनायक पवार (वय २८, सर्व रा. वर्णे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईत बैलगाडी चालक, प्रेक्षक व आयोजक पळून जात असताना घटनास्थळी तीन बैल, तीन मोटार सायकल, दोन पिकअप व त्यांचे मालक-चालक पोलिसांना मिळून आले.

या बेकायदा शर्यतीबाबत माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, बाजीराव पायमल यांच्यासह डीबीचे पोलीस नाईक किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव, कपिल टिकोळे यांनी घटनास्थळी जावून बैलगाडी शर्यतीला मज्जाव केला. बैलगाडी चालक, प्रेक्षक व आयोजक पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर या कारवाई करत असताना संशयित सागर पवार हा मोटार सायकल (एमएच ११ सीएफ ३८४१) सुरू करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना डाळिंबकर यांनी दुचाकी अडवली. त्यावेळी त्याने त्यांना ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. याप्रकरणी सागर पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या