उंब्रज : कराड तालुक्यातील उंब्रज येथील नागरिकांचा कोरोना या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी गणेशोत्सवात दहा दिवस मोफत आयुर्वेदिक शक्तिवर्धक काढ्याचे वाटप केले जाणार असून याचा लाभ उंब्रजकरांनी घ्यावा, असे आवाहन कमलाकर पाटील यांनी केले आहे.
कोरोना महामारीचे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. या काळात अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना लोकांच्या मदतीला धावून येत आहेत. उंब्रज येथील विविध संघटनांनीही या परिसरातील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून रोटरी क्लब ऑफ उंब्रज, कै. रामचंद्र जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, रोट्रॅक्ट रामचंद्र काँप्लेक्स ग्रुप यांनी कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेशभक्त व नागरिकांना दहा दिवस मोफत शक्तीवर्धक आयुर्वेदिक काढा दिला जाणार आहे. तसेच ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे. उंब्रज येथील सेवा रस्त्यालगत रामचंद्र काँप्लेक्ससमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, कृषी अधिकारी विनोद पुजारी, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिलिंद माने, आशिष पटेल, पवन सावंत, ओंकार पाटणकर उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या