कोयना धरणक्षेत्रात पावसाची संततधार; धरणात ९५.३७ टीएमसी पाणीसाठा | Latest Marathi News

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणात प्रतिसेकंद २७ हजार ७४७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या ९५.३७ टीएमसी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा ९०.२४ टीएमसी इतका आहे. शनिवारीही कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवर स्थिर ठेवण्यात आले असून पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर २ हजार १०० आणि वक्र दरवाजातून २५ हजार ६४७ क्युसेक असा प्रतिसेकंद २७ हजार ७४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

दोन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे पावसाचे कमी-अधिक प्रमाण पाहता धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण राखण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता दीड फुटाने उचलून १० हजार क्युसेक व सायंकाळी ५.३० वाजता ४ फुटाने उचलून २७ हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तद्नंतरही पावसाची संततधार सुरूच असल्याने शनिवारी कोयना धरणाचे दरवाजे ४ फुटांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला.

त्यानुसार कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० व सहा वक्र दरवाजातून २५ हजार ६७४ असा एकूण प्रतिसेकंद २७ हजार ७४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ दिसून येत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २७ (३९०६), नवजा येथे ४५ (४४८१) आणि महाबळेश्वर येथे १५ (४३४५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रातील प्रतापगड येथे १६ (३८२४), सोनाट २० (३२३५), बामणोली २१ (३७३९), काठी १९ (२७८१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयातील पाणीपातळी २१५५.१० फूट व ६५७.०९८ मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात ९५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला असून उपयुक्त पाणीसाठा ९०.२४ टीएमसी आहे. कोयना धरण ९०.६१ टक्के भरले आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या