मायणी पक्षी आश्रयस्थान ‘राखीव क्षेत्र’ होणार; प्रस्ताव शासनाकडे पाठविणार | Latest Marathi News

सातारा : खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रेवाडी व येरळवाडी येथील तलाव व सुर्याचीवाडी येथील पाझर तलाव हा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांकरिता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३६ (अ) अन्वये मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती वडूजचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. फुंदे यांनी दिली.

मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान येथे आज कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक) डॉ. क्लेमेंट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींनी हे क्षेत्र मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत सहमती दर्शविली. या सभेस सातारचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, कोल्हापूर विभागीय वनाधिकारी (दक्षता) सागर गवते, सातारचे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) संजीवन चव्हाण, वडूजच्या वनक्षेत्रपाल शीतल पुंदे, मानद वन्यजीवरक्षक सुनिल भोईटे, वनकर्मचारी तसेच मायणी परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

पक्षी अभयारण्य म्हणून लोकमान्यता

सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी आश्रयस्थान हे राज्यभरातील पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचे वेंâद्र आहे. कित्येक वर्षांपासून हजारो मैलांचा प्रवास करून परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात मायणी तलाव परिसरात येत असतात. त्यांच्या किलबिलाटाने हा परिसर मोहरून जातो. राज्यातीलच नव्हे तर देशविदेशातील पक्षीप्रेमी या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. शासन दरबारी आजवर याची फारशी दखल घेतली गेली नसली तरी पक्षी व पर्यावरणप्रेमींनी या परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून लोकमान्यता दिलेली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या