सातारा : धनगर समाजाचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती (एसटी) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, त्यानंतरच सरकारने मेगा भरती करावी, मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा आदी मागण्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने केल्या आहेत.
महासंघाच्या वतीने यासंदर्भात कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराबाबत सरकार गप्प का? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि राजे यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाकडे निधीची चौकशी करावी, अहिल्यादेवी आवास योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, जंगली श्वापदांचे हल्ले होत असल्याने मेंढपाळांना संरक्षणासाठी शासनाने शस्त्र परवाने द्यावेत, घोंगडी व्यवसाय अडचणीत आल्यामुळे त्यासाठी अर्थसहाय्य करावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी नितीन खताळ, अनिल खताळ, संतोष कोकरे, तेजस्वी बिचुकले, मच्छिंद्र खताळ, सचिन कोकरे उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या