सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रिंट मीडिया अडचणीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांची जाहिरात दरवाढ करावी यासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्यावतीने सातत्याने राज्य शासनस्तरावर प्रयत्न केला जात होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांना दरवाढ व श्रेणीवाढ दिली असल्याची माहिती असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती व जनसंपर्क खात्याचे आदित्य तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे त्याचबरोबर विभागातील संचालक, उपसंचालक, पुस्तके व प्रकाशने विभागाचे अधिकारी यांना आभाराचे पत्र देऊन राज्यातील लघु-मध्यम वृत्तपत्रांना दिलासा दिल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, राज्य सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, संघटक गोरख तावरे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, समन्वयक नेताजी मेश्राम, राज्य प्रसिध्दीप्रमुख रंगराव शिंपुकडे यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवरील ८३३ वृत्तपत्रांना जाहिरात दरवाढ व श्रेणीवाढ देऊन दिलासा दिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध होत नसलेली तसेच अनियमित असलेली ४४ वृत्तपत्रे शासनमान्य यादीतून वगळण्यात आली आहेत. माहिती व जनसंपर्वâ महासंचालनालयाने १३ ऑगस्ट रोजी शासन आदेश पारित करून ज्या वृत्तपत्रांना दरवाढ दिली आहे आणि ज्या वृत्तपत्रांना श्रेणीवाढ दिली आहे त्यांचा या आदेशांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शासकीय संदेश प्रसार नियमावली – २०१८ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नवीन नियमावलीनुसार जी वर्तमानपत्रे पात्र आहेत अशा महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांसह लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही दरवाढ, श्रेणीवाढ देण्यात आलेली आहे. ठाकरे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडियासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही संघटना सातत्याने शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याने अखेर या प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यामुळे अनेक संपादकांनी आनंद व्यक्त केला आहे, असे आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले. सध्या प्रिंट मीडिया संक्रमणावस्थेतून जात असून प्रिंट मीडियाला या निर्णयामुळे उर्जितावस्था प्राप्त होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


0 टिप्पण्या