मसूरमधील विद्यार्थीप्रिय शिक्षिका भिसे बाई यांचे आकस्मिक निधन | Latest Marathi News

मसूर : कराड तालुक्यातील मसूरच्या श्री शिवाजी विद्यालयातील निवृत्त शिक्षिका अरूणा अरविंद गद्रे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ३ मुली, १ मुलगा, जावई, नातवंडे, २ भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मसूरचे स्वातंत्र्य सैनिक डॉ. बाळकृष्ण भिसे यांच्या कन्या असलेल्या अरूणा गद्रे यांना तमाम मसूरकर भिसे बाई म्हणूनच ओळखत. समर्पित भावनेने ज्ञानदान करणाऱ्या त्या शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी तालासुरात शिकवलेल्या कविता विद्यार्थ्यांच्या आजही स्मरणात आहेत. सामाजिक, साहित्यिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असे. सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांना आदर व आपुलकी होती. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल मसूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. कराड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या