सातारा : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे द्यायची नाहीत अशी प्रशासनाची ताकीद असल्यामुळे औषध दुकानातील अनेक औषधे पडून रहात आहेत. त्यांची एक्स्पायरी डेट होऊन जात असल्याने औषध दुकानदारांचे सध्या प्रचंड नुकसान होत असल्याचे जळजळीत वास्तव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष व ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी मांडले आहे.
क्रोसिन, जेलोसिलसारखी पित्ताची औषधे, आयुर्वेदिक औषधे यासारखी सर्वसामान्य आजारांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी औषधेसुध्दा (ओटीसी मेडिसिन) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येऊ नयेत असे बंधन प्रशासनाने घातले आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारख्या त्रासांवरील औषधे काऊंटरला देऊ नयेत आणि त्यातूनही समजा दिली, तर संबंधित रूग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक याची नोंद ठेवून ती प्रशासनाला कळवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे किरकोळ आजारांसाठी दवाखान्यात जाण्यापेक्षा औषध दुकानातून घेतल्या जाणाNया औषधांचा खप ठप्प झाला आहे, अशी वैâफियत पाटील यांनी सांगितली. मात्र विरोधाभास असा की अशा औषधांच्या टीव्ही आणि मुद्रित माध्यमातील जाहिराती बंद झालेल्या नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
किरकोळ आजारांसाठी उपचार घ्यायला बाहेर पडल्यास दवाखानेच उघडे नसल्याने डॉक्टरांच्या चिठ्ठ्या मिळत नाहीत. एकिकडे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. आणि दुसरीकडे औषध व्यवसायही अडचणीत आला आहे. चिठ्ठीशिवाय देता येतील अशी अनेक औषधे ‘चिठ्ठी’ च्या अटीमुळे पडून रहात आहेत. त्यांची एक्स्पायरी डेट निघून जात असल्यामुळे औषध व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनाने काही मध्यममार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कृतज्ञता दाखवली जात नसल्याची खंत
कोरोना संकटाच्या काळात जशी सेवा डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासन देत आहे, तशीच सेवा मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून फार्मासिस्टनी दिली आहे. त्यांनाही कोरोना संसर्गाचा तेवढाच धोका आहे. असे असताना रूग्णांना औषध वितरण करून, काही वेळा घरपोच सेवा देऊन फार्मासिस्टनी त्यांना सेवेपासून वंचित ठेवले नाही. कडक लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी ही अत्यावश्यक सेवा देताना फार्मासिस्टना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या. परंतु इतर सेवा दात्यांप्रमाणे फार्मासिस्टचा कोरोना योध्दा म्हणून कोठेही उल्लेख झाला नाही याची या व्यावसायिकांना थोडी का होईना खंत वाटते, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या