बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या जिवाशी खेळ; एकाच बसमध्ये कोंबले | Latest Marathi News

सातारा : जावली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा शहराची कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल होत असताना मेढ्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी एकाच गाडीत बसवून त्यांची ने - आण केल्याने जनतेत असंतोष पसरला आहे. ही कोरोना हटाव मोहीम आहे की कोरोना बचाव मोहीम आहे हेच लक्षात येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जनता करत आहे.

मेढा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्ण सापडत असताना त्या कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या याद्या बनविल्या गेल्या. त्या संशयितांना रायगाव येथे तपासणी करण्यासाठी नेण्यात आले. परंतु त्या संशयितांना नेताना व परत आणताना गाडीमध्ये कोंबण्यात आले. यामध्ये दोन गरोदर महिला असताना गाडीमध्ये एकही डॉक्टर नव्हता. संबंधित बस ही एका शाळेची बस असून कमी ट्रीप करून जादा पैसे कमविण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार आहे.

एसटीने प्रवास करताना एका सीटवर एकच व्यक्ती असा आदेश असताना कोरोना संशयितांचा वडाप पद्धतीने प्रवास कसा केला जातो असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोना संशयितांना वडापसारखा प्रवास करावा लागला. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मुख्याधिकारी जनतेच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत. कागदी घोडे नाचवण्यात पटाईत असलेले मुख्याधिकारी शासनाने घालून दिलेल्या नियमांचीच पायमल्ली करताना दिसत आहेत. सध्या मेढा कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे वाटचाल करताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना एकाच गाडीत दाटीवाटीने बसवून त्यांना मेंढरासारखी वागणूक दिली जात असल्याने कोरोना हटाव मोहीम आहे की कोरोना बचाव मोहीम आहे हेच लक्षात येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जनता करत आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या