सातारा : लोकांना अद्यापही कोरोनाच्या भयानकतेविषयी गांभीर्य नाही. माझ्याकडे दररोज कामानिमित्त भरपूर लोक येत असतात. ते लांब असतात तोपर्यंत त्यांच्या तोंडाला मास्क असतो, पण जवळ आल्यावर ते मास्क खाली करून बोलतात. हे धोकादायक असून मला त्याची भीती वाटते, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील नुकतेच एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांना सतावणारी ती भीती आता त्यांच्यासमोर उभी राहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून बाळासाहेब पाटील कराड उत्तर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांच्या निष्ठेची कदर करत राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांचा सन्मान केला आहे. या संधीचे सोने करण्याच्या इराद्याने बाळासाहेब पाटील कोरोनाच्या संकटातही न थांबता ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ करत आहेत. हे करताना ते जनतेला कोरोनासंदर्भात जागृत करण्याचा प्रयत्न सतत करताना दिसले आहेत.
अत्यंत साधेपणाने राहणारे, लोकांमध्ये मिसळणारे व सर्वसामान्य माणसाचीही ओळख ठेवणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती नेहमीच समर्थकांची गर्दी असते. पण याच प्रेमाने त्यांचे टेन्शन वाढवले होते. ८ ऑगस्ट रोजी मसूर ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तुच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ही भीती त्यांनी बोलून दाखवली होती. जवळ आल्यावर मास्क खाली घेऊन बोलण्याच्या लोकांच्या सवयीमुळे मला भीती वाटते. यातून काही घडल्यास या संकटाच्या काळात मला रूग्णालयात थांबावे लागेल असे ते म्हणाले होते. त्यांना वाटणारी ती भीती खरी ठरली आहे. मात्र त्यानंतरही त्यांनी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या